Ratnakar Matkare
  • आरंभ
  • साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • व्यक्ती
  • कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान
  • संपर्क
×
  • आरंभ>
  • साहित्य>
    • नाट्य
      • नाटक
      • नाटक: मुलांसाठी
      • एकांकिका
      • एकांकिका: मुलांसाठी
      • भाषांतरे
      • नाट्यरूपांतरें
    • लेख
      • ललित
      • साहित्य, रंगभूमी
      • समाजकीय, राजकीय
      • आत्मचरित्रपर
      • विनोदी
    • कथा
    • कादंबरी
    • कविता
    • चित्रपट
    • चित्रमालिका
  • प्रकाशित पुस्तके>
    • नाटक
    • नाटक: मुलांसाठी
    • एकांकिका
    • एकांकिका: मुलांसाठी
    • गोष्टी: मुलांसाठी
    • गाणी: मुलांसाठी
    • कथासंग्रह
    • कादंबरी
    • ललितलेख
    • काव्यसंग्रह
  • व्यक्ती>
    • संक्षिप्त परिचय
    • मतकरीविषयी लेख
    • मतकरींच्या मुलाखती
    • छायाचित्रे
    • चित्रे
  • कार्य>
    • सामाजिक कार्य
    • संस्था
    • संपादकीय काम
    • इतर कार्य
  • पुरस्कार आणि सन्मान>
  • संपर्क>
कार्य
सामाजिक कार्य>
संस्था >
संपादकीय काम>
इतर कार्यक्रम>
संस्था

बालनाट्य या संस्थेची निर्मिती १९६२ साली करण्यात आली आणि तेव्हापासून या संस्थेतर्फे मुलांसाठी उत्तम, दर्जेदार, साहित्य-अभिनय- रंगगुणांनी युक्त अशा नाटकांची सातत्याने निर्मिती करण्यात आली. केवळ रंजनापलीकडे जाऊन वेगळ्या प्रकारची नाटकं करण्याकडे या संस्थेचा कल राहिला. जवळजवळ प्रायोगिक बाजाचं ‘निम्मा शिम्मा राक्षस’, विडंबनात्मक ‘अलीबाबाचं खेचर आणि एकोणचाळीसावा चोर’, समतेचा संदेश देणारं ‘राक्षसराज झिंदाबाद’, परीकथेला आधुनिक संदर्भात नव्याने मांडणारं ‘बुटबैंगण’, आणि मुलांमधे अतिशय लोकप्रिय असलेलं ‘अलबत्या गलबत्या’, या आणि अशा अनेक नाटकांची निर्मिती बालनाट्यने केली. हे करतानाच बालनाट्यने हाही दृष्टीकोन ठेवला की ज्या मुलांना नाटकं नाट्यगृहात येऊन पहाता येत नसतील त्यांच्यासाठी नाटकाने मुलांपर्यंत जायला हवं. यासाठी शाळा, हाॅस्पिटल्स, झोपडपट्ट्या, बालसुधारगृह अशा ठिकाणीही नाट्यप्रयोग करण्यात आले. बालरंगभूमीसारख्या कुपोषित नाट्यक्षेत्रात एक भक्कम सांस्कृतिक योगदान देण्याचं काम बालनाट्यने वर्षानुवर्ष समर्थपणे पार पाडलं आहे.

सूत्रधार ही नाट्यसंस्था १९७० पासून प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. सूत्रधारने काही अत्यंत वैविध्यपूर्ण आणि संस्मरणीय नाटकांची निर्मिती केली आहे. ‘प्रेमकहाणी’, 'चुटकीचे नाटक’, ‘आरण्यक’ , ‘लोककथा ७८’ , ‘गणेश गिरणीचा धैकाला’ ही त्यातली काही. 'लोककथा ७८' इतर भाषांमधेही अवतरलं आणि राष्ट्र सेवा दल, इप्टा, भारत भवन, रंगकर्मी या नामांकित संस्थांप्रमाणेच अनेक लहानमोठ्या संस्थांनीही त्याचे प्रयोग केले. ही सर्व नाटकं स्वतंत्र होती आणि प्रायोगिक रंगभूमीच्या वापरातून काही विचार मांडण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली. दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, डाॅ मीनल परांजपे, वसंत सोमण, अजय वढावकर, प्रदीप भिडे, सुप्रिया विनोद अशा अनेक नामवंत कलाकारांचा प्रवास बालनाट्य आणि सूत्रधार या संस्थांबरोबर झाला. चळवळ स्वरुपात अनेक वर्ष चाललेलं या संस्थेचं काम हे कोणत्याही अनुदानाशिवाय वा आर्थिक सहाय्याशिवाय केवळ रसिकांचं कौतुकमिश्रीत प्रेम आणि साधार अपेक्षा यांमधून बळ घेऊनच करण्यात आलं.

बालरंगभूमीसाठी काम करणारी ‘बालनाट्य’ आणि प्रायोगिक निर्मितीसाठी स्थापन केलेली ‘सूत्रधार’ यांबरोबरच व्यावसायिक निर्मिती करण्यासाठी १९८७ साली ‘महाद्वार’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. महाद्वारने रंगभूमीबरोबर इतर माध्यमांमधूनही महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. ‘विठो रखुमाय’ आणि ‘इंदिरा’ ही महत्वाची नाटकं, तसंच ‘बेरीज वजाबाकी’ आणि मतकरींच्या गूढकथांवर आधारीत ‘गहीरे पाणी’ या चित्रमालिकांची निर्मिती महाद्वारने केली. महोत्सवांमधून गाजलेल्या ‘मी, टाकलेली बाई’ या माहितीपटाबरोबर आणि ‘शाॅट’ या लघुपटाबरोबरच महाद्वारने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ‘इन्व्हेस्टमेन्ट’ या मराठी चित्रपटाचीही सहनिर्मिती केली आहे.